आमचा प्रवास

आमची सुरुवात 2017 मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या डबिंग च्या प्रयोगांनी झाली. आमच्या पहिल्या व्हिडिओत डोनाल्ड तात्यांनी मराठीत बाहुबली 2 विषयी दमदार मत व्यक्त केले,मुळातच ही संकल्पना नवीन असल्यामुळे आम्हाला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. वास्तविक जीवनामध्ये असलेले ट्रम्प आणि आम्ही दाखवलेले ट्रम्प तात्या यामध्ये फरक असल्यामुळे ट्रम्प तात्या लवकरच तरुणांमध्ये लोकप्रिय झाले.अशाप्रकारे तात्यांची लोकप्रियता महाराष्ट्रासह जगभरातील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचली, डोनाल्ड ट्रम्प यांचे व्हिडिओ अधिकाधिक शेअर होत गेले, या सगळ्या गोष्टींची मीडियाने देखील दखल घेतली. यानंतर खासरेच्या टीमने नेटफ्लिक्स वरील लोकप्रिय सिरीज नार्कोस मधून पाबलो शेठला प्रेक्षकांसमोर आणले आणि तात्यांसारखेच हे कॅरेक्टर देखील लोकांना खूप आवडले. डेडपूल च्या ट्रेलर चे मराठी व्हर्जन तर फॉक्स स्टार स्टुडिओने त्यांच्या ऑफिशियल अकाउंट वर रिपोस्ट केले.

या सर्व डबिंग व्हिडिओ चा प्रवास तानाजीचा मराठी ट्रेलर, मोदीजी अन लागीर झालं जी या प्रकारे सुरू असताना आम्ही पुढचे पाऊल घेऊन स्वतःचे शो लॉन्च केले व ते देखील लोकांमध्येखूप गाजले. थेट भेट विथ निक्की जिगर या शोमध्ये संजय कांबळे यांनी भूमिका केली आणि या शो चे आठ भाग प्रसारित झाले आहेत. कुशल बद्रिके, विजू माने, अमेय वाघ, सई ताम्हणकर, रसिका सुनील, निपुण धर्माधिकारी, सारंग साठे, स्पृहा जोशी, ऋषिकेश जोशी, संजय जाधव, अभय महाजन, सायली पाटील, प्रथमेश परब, रितिका श्रोत्री यांसारखे दिग्गज सेलिब्रिटी पाहुणे आम्हाला लाभले. आमचा हा प्रवास लोकप्रिय गाण्यांचे पॅरोडी जसे की सख्खी बायको गेली याचे 'सख्खी गर्लफ्रेंड गेली' हे अमेय वाघ आणि सई ताम्हणकर यांनी केले. तसेच ब्राऊन मुंडे या गाण्याचे गावरान मुंडे, बेला बेला चाव चे लस घ्या, डीजे ब्रावो चा चॅम्पियन गाण्याचे चहा प्या डिवाइन च्या मिरची सॉंग चे मिरचू याप्रकारे सुरू आहे.

प्रेक्षकांना हसवत राहण्याचा आमचा प्रयत्न नेहमी चालूच राहील.

आमचे विचार

मराठमोळा कन्टेन्ट आगळ्यावेगळ्या पद्धतीने जगभरातील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे.

आमचे ध्येय

वाढीव कंटेन्ट सोबत कायम तुम्हाला पोटभरून खळखळून हसवणं.